रोझरी शाळेच्या फी वाढीविरोधात उपोषण

July 27, 2010 3:27 PM0 commentsViews: 1

27 जुलै

पुण्यातील रोझरी शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. रोझरीच्या पाच शाळा पुण्यात आहेत. त्यांनी मनमानी फी वाढ केली आहे. त्याविरोधात वारंवार तक्रारी देऊनही शिक्षण उपसंचालक आणि संचालकांनी कुठलीच कारवाई केली नाही. याचा निषेध म्हणून आजपासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली.

त्यानंतर शिक्षण उपसंचालक सुनील मगर यांनी शाळांना अंशत: फीवाढ मागे घेण्याचे आदेशही नुकतेच जारी केल्याची माहिती दिली. मात्र शाळा हे आदेश पाळेल, याबाबत पालकांना विश्वास वाटत नाही.

शाळा जोपर्यंत याबाबत लेखी हमी पालकांना देत नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार पालकांनी व्यक्त केला आहे.

close