अपंग कार्यकर्त्यांचे ठाण्यात आंदोलन

July 27, 2010 4:53 PM0 commentsViews: 2

27 जुलै

ठाण्यात महाराष्ट्र अपंग विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आज एक अनोखे आंदोलन केले. ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त आर. ए. राजीव यांच्या दालनासमोर या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चक्क कपडे काढून निदर्शने केली.

500 रूपये अनामत रक्कम भरून अपंगांनी ठाणे महानगरपालिकेत स्टॉल बुक केले होते. पण पालिकेने अजून जागाच उपलब्ध करून दिली नाही. याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले गेले.

आंदोलनानंतर महाराष्ट्र अपंग विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

close