सालेम आणि डोसाला पोलीस कोठडी

July 28, 2010 9:14 AM0 commentsViews: 3

28 जुलै

मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये मुस्तफा डोसा याने अबू सालेमवर हल्ला केला होता. या मारहाण प्रकरणी मुस्तफा डोसा आणि कय्युम यांना मुंबईतील किल्ला कोर्टात आज हजर करण्यात आले. या दोघांना कोर्टाने 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हल्ल्यानंतर सालेमवर जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. बनावट पासपोर्ट प्रकरणी त्याच्यावर भोपाळ कोर्टात खटला सुरू होता. काल भोपाळच्या कोर्टात अबूला याप्रकरणी हजर करण्यात आले होते.

आज सकाळी रेल्वेने त्याला कुर्ल्याला आणण्यात आले. तिथून त्याची रवानगी तळोजा जेलमध्ये करण्यात आली.

close