पुण्यातील हाणामारी प्रकरणी संजय जगताप निलंबीत

July 28, 2010 9:19 AM0 commentsViews: 48

28 जुलै

पुण्यात काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काल जोरदार हाणामारी झाली होती. या प्रकरणी संजय जगताप यांना प्रदेश काँग्रेस समितीने निलंबीत केले आहे.

त्याचबरोबर पुढच्या चौकशीसाठी काँग्रेसने एक समिती नेमली आहे. त्यात रामशेठ ठाकूर, आणि रमेश शेट्टींचा समोवेश आहे.

काल पुरंदरचे काँग्रेस नेते संजय जगताप यांच्या समर्थकांनी माजी आमदार संभाजी कुंजीर यांना खुर्चीने जबर मारहाण केली होती.

दरम्यान हा हल्ला करणारे काँग्रेस कार्यकर्ते नव्हते तर गुंड होते असा आरोप कुंजीर यांनी केला होता. या प्रकरणी आज संजय जगताप यांना पक्षातून निलंबीत करण्यात आले आहे.

close