जावेदची पोलिसांविरुद्ध तक्रार

July 28, 2010 10:37 AM0 commentsViews: 4

28 जुलै

कुर्ला नेहरूनगर बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी जावेद शेखला 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

आज विक्रोळी कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुसरत शेख हत्याप्रकरणाची सुनावणी झाली. यात आरोपी जावेद शेखने आपल्याला पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याची तक्रार विक्रोळी कोर्टाचे न्यायाधीश एस.बी.गायधने यांच्याकडे केली.

याची दखल घेत न्यायाधिशांनी ठाणे जेलचे अधिक्षक आणि नुसरत शेख प्रकरणातील तपास अधिकार्‍यांना 31 जुलैपर्यंत या तक्रारीवर उत्तर देण्यास सांगितले आहे.

close