सचिनची 48वी सेंच्युरी

July 28, 2010 11:39 AM0 commentsViews: 1

28 जुलै

कोलंबो टेस्टमध्ये भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शानदार सेंच्युरी ठोकली आहे. टेस्ट करियरमधील ही त्याची तब्बल 48वी सेंच्युरी ठरली आहे.

आता सेंच्युरीची हाफसेंच्युरी करण्यासाठी सचिनला फक्त दोन सेंच्युरीजची गरज आहे.

168 टेस्टमध्ये त्याने ही कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्ह वॉच्या सर्वाधिक टेस्ट रेकॉर्डशीही सचिनने बरोबरी केली आहे.

लंकेने ठेवलेले 642 रन्सचे टार्गेट समोर ठेवून खेळणार्‍या भारतीय टीमचे प्रमुख चार बॅटसमन झटपट आऊट झाले. पण सचिन तेंडुलकरने मैदानावर तळ ठोकत भारताची इनिंग सावरली आणि आपली सेंच्युरीही पूर्ण केली.

close