महागाई स्थगन प्रस्ताव फेटाळला

July 28, 2010 12:25 PM0 commentsViews: 3

28 जुलै

महागाईच्या मुद्द्यावर विरोधकांनी आणलेला स्थगन प्रस्ताव लोकसभेच्या अध्यक्षा मीराकुमार यांनी फेटाळला. त्यामुळे सलग दुसर्‍या दिवशी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला.

लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सरकार आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले नाही, असे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सभागृहात सांगितले. त्यांचा तो मुद्दा ग्राह्य धरत स्थगन प्रस्तावाची मागणी मान्य करता येणार नाही, असे मीराकुमार यांनी सांगितले.

मीराकुमार यांच्या या घोषणेनंतर विरोधक संतापले. त्यांनी अध्यक्षांसमोरच्या हौद्यात धाव घेतली.

स्थगन प्रस्तावाच्या मागणीसाठी भाजप उद्या संसदेच्या बाहेर धरणे आंदोलन करणार आहेत. त्याला डाव्यांनीही पाठिंबा दिला आहे.

close