मुख्यमंत्री बागवेंवर नाराज

July 28, 2010 12:33 PM0 commentsViews: 10

28 जुलै

मुख्यमंत्री अशोक चव्हाण गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यावर नाराज झाले आहेत. आणि त्याचे कारण आहे. अलिकडेच बागवेंनी आर्थररोड जेलबद्दल केलेल वक्तव्य…

अनेक महत्त्वाच्या कैद्यांना जिथे ठेवले जाते ते आर्थर रोड जेल असुरक्षीत आहे. तसेच अबू सालेम आणि मुस्तफा दोसासारख्या कैद्यांची तुरुंगात बडदास्त ठेवली जाते, असा आरोप गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केला होता.

ऑर्थर रोड जेलमधील काही ठिकाणी जायला आपल्याला मनाई करण्यात आली, असेही बागवे यांनी म्हटले होते.

पण हे विधान सभागृहात न करता बागवे परस्पर मीडियाशी बोलले. मीडियाशी बोलल्यामुळे मुख्यमंत्र्यानी बागवेंबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

close