नाशिकच्या तरुणाने बनवली मोबाईल डिक्शनरी

July 28, 2010 1:13 PM0 commentsViews: 16

28 जुलै

अडलेल्या इंग्रजी शब्दांचे अर्थ आता हाताच्या बोटांवर कळणार आहेत. नाशिकच्या एका तरुणाने मोबाईल डीक्शनरी तयार केली आहे.

दोन वर्षे मेहनत करून सुनील खांडबहाले या तरुणाने खास मराठी मुलांसाठी ही डिक्शनरी तयार केली आहे.

यामध्ये दीड लाखांपेक्षा जास्त इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ काही सेकंदातच मिळण्याची सोय आहे. मराठी विद्यार्थ्यांना तसेच वेगवेगळ्या व्यवसायात कार्यरत मराठी तरुणांना याचा उपयोग व्हावा, हा सुनीलचा उद्देश आहे.

मंगळवारी नाशिक शिवसेनेच्या महानगरप्रमुखांनी 10 हजार डिक्शनरी कार्ड्सही तरुणांना वाटले.

close