खासदाराची शाळा, बिनछपराची!

July 28, 2010 1:16 PM0 commentsViews: 4

28 जुलै

बसायला बाके तर नाहीतच…पण डोक्यावर छतही नाही आणि आडोशाला भिंतीही नाहीत, अशी शाळा बघायची असेल, तर जालना जिल्ह्यातील भाकरवाडीला चला…

काट्याकुट्यांचा आडोसा करून भरवलेली इथे भरणारी शाळा आहे, तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेलेल्या खासदार रावसाहेब दानवे यांची…

शाळेत वर छत म्हणून पत्रे टाकलेत. पण तेही गळके आहेत. काही वर्गात शिक्षकच नाहीत. एक वर्ग तर चक्क झाडाखालीच भरवला जातो. खासदारांची शाळा असल्यामुळे शिक्षण विभागही तपासणी न करताच या शाळेला अनुदान देत आहे.

धक्कादायक प्रकार म्हणजे कोणतेही चार वर्ग भरवून या शाळेसाठी पाचवी ते बारावीपर्यंतचे अनुदान उचलले जात आहे. शिक्षण विभागही डोळ्यावर पट्टी बांधून या शाळेला अनुदान देत आहे.

पाचवी ते बारावीपर्यंतच्या या शाळेत चारच वर्ग भरतात. मग इतर वर्ग गेले कुठे हा प्रश्नही अनुत्तरीतच आहे.

close