विक्रोळी कोर्टाकडूनही राज ठाकरेंना जामीन

October 23, 2008 2:35 PM0 commentsViews: 3

23 ऑक्टोबर, मुंबईराज ठाकरे यांना विक्रोळी कोर्टानं 7 नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. विक्रोळी कोर्टानं राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती. चिथावणीखोर भाषणं करण्याच्या प्रकरणावरुन 13 फेब्रुवारीला दिलेला जामीन का रद्द करू नये, अशी विचारणा या नोटीसीमध्ये करण्यात आली होती. राज ठाकरेंकडून त्याला उत्तर देण्यात आलं. विक्रोळी कोर्टानंही राज ठाकरे यांना 7 नोव्हेंबरपर्यंत अतंरिम जामीन मंजूर केला. विक्रोळी कोर्टाकडून तूर्तास तरी दिलासा मिळाला. दरम्यान, राज ठाकरे यांनी मुंबईतल्या खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये आज हजेरी दिली. वांद्रे कोर्टानं मंगळवारी त्यांची जामिनावर सुटका केली होती आणि आठवडाभर खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज यांनी हजेरी दिली तसंच कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनमध्येही राज यांनी हजेरी लावली.

close