गोदावरीत रासायनीक प्रदूषण नाही

July 28, 2010 1:31 PM0 commentsViews: 197

28 जुलै

गोदावरी नदीपात्रातील प्रदूषण रासायनिक नसून ड्रेनेजच्या लिकेजचे असल्याचे प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे म्हणणे आहे.

महापालिके च्या तब्बल दीडशे ड्रेनेज लाईन फुटल्या असून त्याचे दूषित पाणी थेट गोदावरीत मिसळत आहे.

नाशिकमध्ये गोदावरीतून प्रचंड दूषित, दुर्गंधीयुक्त आणि फेसाळलेले पाणी वाहत आहे. यात मोठ्या प्रमाणावर पाणवेलीही वाढल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी याची पाहणी करून हे रासायनिक प्रदूषण असल्याचे म्हटले होते.

मात्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकार्‍यांनी याची पाहाणी केली. त्यावेळी ठिकाणी ड्रेनेज फुटून थेट नदीपात्रात दूषित पाणी घुसत असल्याचे सिद्ध झाले आहे.

close