‘खैरलांजीची पुन्हा चौकशी नको’

July 28, 2010 1:47 PM0 commentsViews: 3

28 जुलै

खैरलांजी हत्याकांडाची पुन्हा चौकशी नको, अशी भूमिका भैय्यालाल भोतमांगे यांनी घेतली आहे. तसेच न्याय मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात वैयक्तिक अपील करणार असल्याचेही भोतमांगे यांनी म्हटले आहे.

तत्कालीन गृहराज्यमंत्री नितीन राऊतांवरही भोतमांगेनी आरोप केलेत. राऊत यांनी फक्त आश्वासने दिली. पण मदत केली नाही, अशा शब्दात त्यांनी हे थेट आरोप केलेत.

पोलीस, सीबीआय आणि राज्यसरकार सर्वांनीच योग्य तपास केला नाही, असा आरोपही भोतमांगे यांनी केला आहे.

close