रायगडमधील सरकारी हॉस्पिटल दुरवस्थेत

July 28, 2010 2:06 PM0 commentsViews: 2

मोहन जाधव, अलिबाग

28 जुलै

तब्बल 90 लाखांचा निधी..अर्थमंत्र्यांचा भक्कम पाठिंबा…असे सगळे असताना एखादी वास्तू दर्जेदार असावी अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा असणार….रायगड जिल्हा सरकारी हॉस्पिटलबद्दलही अशाच अपेक्षा होत्या…पण आशा फोल ठरल्या आहेत.

अलिबागमधील हे सर्वात मोठे हॉस्पिटल दुरवस्थेत आहे. पावसाळ्यात सतत छत गळल्याने हॉस्पिटलचा स्लॅब कोसळण्यास सुरुवात झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरेंनी या हॉस्पिटलच्या बिल्डिंगसाठी 90 लाखांचा निधी मिळवून दिला होता. यातून बिल्डिंगची दुरुस्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मग ही अवस्था नक्की कशाने झाली, याची उत्तरे मात्र मिळतच नाहीत.

कॉन्ट्रॅक्टरने नीट कामच केले नसल्याने बिल्डिंग नादुरुस्त झाल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी आता उच्चस्तरीय चौकशीचीही मागणी होत आहे.

पण या चालढकलीच्या राजकारणापायी मोठा अपघात होण्याची प्रशासन वाट पाहणार आहे का? असा नागरिकांचा सवाल आहे.

close