कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर

July 28, 2010 3:18 PM0 commentsViews: 9

28 जुलै

कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने पाणी पातळी वाढत आहे.

राधानगरी धरण 96 टक्के भरल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडू शकतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीची राजाराम बंधार्‍यावरची पाणी पातळी 42 फूट इतकी झाली आहे. पंचगंगेची धोका पातळी 43 फूट इतकी आहे. 52 गावांचा संपर्क अंशत: तुटला आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 144 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. 7 तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संतधार कायम असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

त्यामुळे कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील केर्ली इथे पाणी आहे. पर्यायाने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.महापुराचा सर्वाधिक फटका नेहमी शिरोळ तालुक्यातील गावांना बसतो.

या तालुक्यातील 7 गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला असला, तरी या गावांना पर्यायी मार्गांने वाहतूक सुरू आहे.

close