पाकिस्तानातील विमान अपघातात 152 ठार

July 28, 2010 4:02 PM0 commentsViews: 2

28 जुलै

पाकिस्तानमध्ये आज खासगी प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला. त्यात विमानातील सर्वच्या सर्व 152 प्रवासी ठार झाले. एअर ब्ल्यू फ्लाईटचे हे विमान कराचीहून इस्लामाबादला जात होते. त्यावेळी ते इस्लाबादजवळच्या मर्गल्ला टेकडीजवळ कोसळले.

सकाळी दहा वाजता इस्लामाबादजवळच्या मर्गल्ला टेकडीजवळ हा अपघात झाला.

मर्गल्ला टेकडीचा भाग हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. अपघाताच्या ठिकाणी पोचण्यासाठी एकच पायवाट होती. त्यामुळे बचावकार्य कठीण बनले. त्यात भर म्हणजे पावसाळी हवामानामुळे हेलिकॉप्टर उतरवणेही अशक्य बनले होते. घटनास्थळापासून हॉस्पिटलसुद्धा एकच एक तासांच्या अंतरावर होते.

दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. प्राथमिक अहवालानुसार खराब हवामान हेच अपघाताचे कारण असावे असे सांगितले जाते. पण एअरलाईन कंपनीने त्याचा इन्कार केला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या अध्यक्षतेखालच्या शिष्टमंडळाने अपघाताच्या ठिकाणी भेट दिली. आणि घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.

close