विदर्भात शेती अवजारांच्या खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा

October 23, 2008 3:37 PM0 commentsViews: 150

23 ऑक्टोबर, नागपूरविदर्भातल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी केंद्रानं दिलेल्या पॅकेजतर्गंत शेतकर्‍यांना देण्यात आलेल्या शेती अवजारांच्या खरेदीतही कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पॅकेजमधील गाई वाटपातही घोटाळा झाल्याचं यापूर्वीच उघड झालंय. कृषी विभागाने शेती अवजारांची बाजार भावापेक्षा जास्त भावानं खरेदी केल्याचा आरोप वादिम या संस्थेनं केलाय. पॅकेजतर्गंत सहा जिल्ह्यातल्या साठ हजार शेतकर्‍यांना 25 हजार रुपयांपर्यंत शेतीसाठी अवजारं देण्याचं ठरलं होतं. सरकारनं अवजारं पुरवण्याचं कंत्राट वेगवेगळया कंपन्यांना दिलं. पण कंपन्यांच्या किंमतीत फार मोठी तफावत दिसून येते. नॅपसपस्प्रेअर फवारणी यंत्राच्या खरेदीतही घोळ झाला आहे. एका यंत्राची किंमत 308 रुपये असताना 1500 रुपये भावानं खरेदी करण्यात आली. लोखंडी बैलगाडीच्या खरेदीतही असाच घोळ झालाय. एका लोखंडी बैलगाडीची किंमत बाजारभावाप्रमाणे 9 हजार 800 रुपये असताना 13 हजार 600 रुपये मोजण्यात आले. शेतकर्‍यांची कर्जातून सुटका करण्यासाठी कोटीचं पॅकेज आलं पण आकड्यांच्या या भुलभुलैय्यात फायदा फक्त सरकारी अधिकार्‍यांचाच झाला. दोषींना शिक्षा होण्याची आणि गरजूंपर्यंत मदत पोहोचण्याची गरज आहे.

close