सचिनचे पाचवे द्विशतक

July 29, 2010 9:32 AM0 commentsViews:

29 जुलै

कोलंबो टेस्टमध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपली पाचवी डबल सेंच्युरी झळकावली आहे. श्रीलंकेत सचिनची ही पहिलीच सेंच्युरी आहे.

आज चौथ्या दिवशीचा खेळ सुरू झाला तेव्हा भारतीय टीमसमोर आव्हान होते, फॉलोऑन टाळण्याचे. पण सचिन आणि सुरेश रैना या पाचव्या जोडीने अडीचशे रन्सची पार्टनरशिप करत फॉलोऑन तर टाळलाच, शिवाय टीमची पहिली इनिंग भक्कम केली.

टीमने आता 600 रन्सचा टप्पा ओलांडला आहे. ध्यानी मनी नसताना त्याने पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. त्याचा साथीदार सुरेश रैना आज 120 रन्सवर आऊट झाला.

पण पदार्पणात सेंच्युरी ठोकण्याची किमया रैनाने केली. सचिन मात्र शंभरपेक्षा जास्त ओव्हर्स पिचवर टिकून आहे.

close