जळगावात व्हायरल इन्फेक्शन सुरूच

July 29, 2010 9:54 AM0 commentsViews: 4

29 जुलै

जळगाव जिल्ह्यात व्हायरल इन्फेक्शनची साथ वाढतच चालली आहे.

अमळनेरच्या मंगरूळ गावातील सेंट मेरी हायस्कूलच्या 25 विद्यार्थ्यांना ही व्हायरल इन्फेक्शनची बाधा झाली आहे.

तसेच जळगाव शहरातील ला. ना. शाळेतील 9 विद्यार्थ्यांनाही या व्हायरलचे इन्फेक्शन झाले आहे. तर 50 विद्यार्थ्यांची तपासणी सुरू आहे.

पाच दिवसांच्या सुट्टीनंतर आज शाळा सुरू झाल्या. मात्र इन्फेक्शनची साथ वाढत चालल्याने आता तिथे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

close