बेळगावसाठी खासदार एकत्र येणार

July 29, 2010 10:13 AM0 commentsViews: 4

29 जुलै

बेळगावच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील खासदार लोकसभेत एकत्र येणार आहेत. बेळगावचा मुद्दा लोकसभेत फक्त शिवसेना लावून धरत होती.

पण काल झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, बेळगावच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसही लोकसभेत महाराष्ट्राची बाजू लावून धरेल. त्यामुळे यानिमित्ताने आता शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याचे चित्र दिसेल.

काँग्रेसनेही बेळगाव आणि बाभळीच्या मुद्द्यावर आवाज उठवण्याचे ठरवले. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष बेळगावच्या मुद्द्यावर लोकसभेत महाराष्ट्राची बाजू लावून धरतील.

आता भाजप यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात आज महत्वाची बैठक होणार आहे.

close