महागाईविरोधात विरोधकांचा गदारोळ

July 29, 2010 10:20 AM0 commentsViews:

29 जुलै

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सलग तिसर्‍या दिवशीही विरोधकांनी महागाईचा मुद्दा लावून धरला. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.

काल लोकसभेच्या अध्यक्षा मीराकुमार यांनी महागाईच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाची विरोधकांची मागणी फेटाळली होती. तरी भाजप स्थगन प्रस्तावाच्या मुद्द्यावर अडून बसला आहे.

संसदेबाहेरही महागाईच्या मुद्द्यावरून सत्ताधार्‍यांविरोधात रान उठवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. डाव्या आणि तिसर्‍या आघाडीच्या खासदारांनी आज सभागृहांचे कामकाज सुरू होण्यापूर्वी संसदेबाहेर जोरदार निदर्शने केली.

तर महागाईच्या प्रश्नावर भाजपचे खासदार राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आहेत. महागाईच्या मुद्द्यावर देशभरातून गोळा केलेल्या 10 कोटी लोकांनी सह्या केलेले निवेदन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना देणार आहेत.

close