कुर्ल्यात बिल्डिंग कोसळून मुलाचा मृत्यू

July 29, 2010 10:30 AM0 commentsViews: 1

29 जुलै

कुर्ल्याच्या कुरेशीनगर भागातील कसाईवाड्यामधील रफिक इस्टेट भागातील एक चार मजली बिल्डिंग कोसळली आहे. या दुर्घटनेत एका 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत.

महापालिकेच्या उर्दू शाळेपाठीमागील या बिल्डिंगमध्ये 25 कुटुंबे राहत होती. ढिगार्‍याखाली अडकलेल्या 10 ते 15 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. फायर ब्रिगेडची 10 युनिटस घटनास्थळी दाखल झाली आहेत. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य वेगाने सुरू आहे.

या बिल्डिंगचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगण्यात येत आहे. बिल्डिंगचा काही भाग जवळच्या शाळेवरही कोसळला. सुदैवाने पाणी भरण्यासाठीया बिल्डिंगमधील नागरिक खाली उतरले होते.

त्याचवेळी बिल्डिंग पडत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्राणहानी टळली.

close