‘रोझरी’ची फीवाढ मागे

July 29, 2010 10:42 AM0 commentsViews: 1

29 जुलै

पुण्यातील रोझरी शाळेने अखेर फी वाढ मागे घेतली आहे. पालक, शिक्षण संचालक आणि शाळा व्यवस्थापनाच्या बैठकीत हा निर्णय झाला.

गेले काही दिवस रोझरीने केलेल्या मनमानी फीवाढीविरोधात पालकांनी आंदोलन सुरू केले होते.

'आयबीएन-लोकमत'ने ही बातमी दाखवली होती. आणि या मनमानी फीवाढीच्या प्रश्नाचा पाठपुरावा केला होता.

अखेर या मोहिमेला यश आले आणि आजच्या बैठकीत ही फीवाढ मागे घेण्याचा निर्णय झाला.

close