दयानंद पांडेवर होणार नवा गुन्हा दाखल

July 29, 2010 11:00 AM0 commentsViews: 4

मनोज देवकर, अमेय तिरोडकर, मुंबई

29 जुलै

मालेगाव स्फोटातील आरोपी दयानंद पांडेवर आता एक नवा गुन्हा नोंदवला जाणार आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हत्येचा कट शिजवल्याचा हा गुन्हा असेल. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत हे स्पष्ट केले आहे.

दयानंद पांडेंच्या लॅपटॉपवरील संभाषण तपासून त्यानुसार पांडेंविरोधात कलम 164 अन्वये गुन्हा दाखल करू, तसेच, या प्रकरणातील सर्व आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करू, असे आर. आर. पाटील यांनी सांगितले आहे.

देशात अस्थिरता माजावी हा या कटाचा मुख्य हेतू होता. त्यामुळेच, या कटाचे सूत्रधार दयानंद पांडे, राकेश धावडे आणि माजी खासदार बी. एल. शर्मा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी होत होती.

आधी मालेगाव…मग अजमेर आणि आता थेट उपराष्ट्रपतींनाच मारण्याचा कट. भगव्या दहशतवाद्यांचे एकेक प्लॅन कठोरपणे समोर आणण्याची गरज आता व्यक्त होत आहे.

close