भारतात पहिल्यांदाच पुरुषांसाठीचा फॅशन शो

October 23, 2008 5:44 PM0 commentsViews: 15

लॅक्मे फॅशन वीकमध्ये फक्त पुरुषांसाठी असलेल्या कपडयांचाच फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं . भारतात पहिल्यांदाच असा शो आयोजित करण्यात आला. मुंबईत सध्या सुरू असलेल्या लॅक्मे फॅशन वीकचा तिस•या दिवसाची थीम होती मेन्स वेअर. या थीममध्ये मोठमोठया डिझायनर्सनी भाग घेतला होता.विशेष म्हणजे वुमेन वेअरपेक्षा मेन्स वेअर मार्केट जास्त ऑर्गनाइझ आहे, असं डिझायनर्सना वाटतं. या शोमध्ये फॅशन दुनियेतले नेहमीचे चेहरे तर होतेच, पण देव आर नील आणि जुबैर किरमानी सारखे नवे डिझायनर्सनीसुध्दा नवे ट्रेंड आणि नव्या स्टाईल्स सादर केल्या. आपल्या देशात मेन्स वेअर डे ही थीम नवीन तर आहे पण याच निमित्तानं नव्या खरेदीदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्नही केला जात.जर हा प्रयत्न यशस्वी झाला, तर आगामी काळात फॅशन इंडस्ट्रीतला हा एक नवा ट्रेंड असेल.

close