पुण्यातील स्वारगेट चौक उड्डाणपुलाला मंजुरी

July 29, 2010 12:52 PM0 commentsViews: 12

29 जुलै

पुण्यातील स्वारगेट चौकातील उड्डाणपूल बांधण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. गेल्या 3 वर्षांपासून स्वारगेटचा हा उड्डाणपूल रखडला होता.

मुंबईत झालेल्या बैठकीत दिवाळीपासून उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. रस्ते विकास महामंडळ आणि पुणे महापालिका यांच्यात नव्याने करार होणार आहे.

बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार मोहन जोशी या बैठकीला हजर होते. जुन्या करारानुसार पालिकेने रस्ते विकास मंडळाला 40 कोटी रूपये याआधीच दिले होते. पण आता हा खर्च वाढणार आहे.

येत्या 3 वर्षात उड्ढाणपुलाचे काम पूर्ण होणार असून यामुळे स्वारगेट ते मार्केट यार्ड या गजबजलेल्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होणार आहे.

close