एनटीसी विकणार गिरण्यांची जागा

July 29, 2010 2:49 PM0 commentsViews: 1

29 जुलै

गिरणगावाच्या जीवावर सोन्याची मुंबई उभी राहत आहे. बंद पडलेल्या गिरण्या ताब्यात घेणार्‍या एनटीसीनेच आता गिरण्यांच्या 55 एकर जागेची विक्री करून पाच हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्याचा निर्धार केला आहे.

मुंबईतील गिरणगावातील बंद पडलेल्या गिरण्यांची जवळपास 55 एकर जमीन बांधकाम व्यावसायीकांना विकण्यात येणार आहे.

एकरामागे 100 कोटी रुपये दराने 55 एकराच्या विक्रीतून चालू आर्थिक वर्षाअखेरीस पाच हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम उभी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री दयानिधी मारन यांनी दिली आहे.

close