सचिन, रैनाची धमाल

July 29, 2010 3:42 PM0 commentsViews: 1

29 जुलै

कोलंबो टेस्टमध्ये आज भारतीय टीमसाठी दुहेरी योग होता. सचिन तेंडुलकरची डबल सेंच्युरी आणि सुरेश रैनाची सेंच्युरी याच्या जोरावर भारतीय टीमने आज फॉलोऑन तर वाचवलाच. शिवाय नऊ विकेटवर 669 रन्स करत लंकन टीमवर पहिल्या इनिंगमध्ये आघाडीही घेतली. त्यामुळे ही टेस्ट ड्रॉ होणार हे आता निश्चित झाले आहे.

आज सकाळी सचिन आणि रैना यांनी कालच्याच थाटात खेळ सुरु केला. आधी सुरेश रैनाने आपली पहिली टेस्ट सेंच्युरी पूर्ण केली. आणि त्यानंतर टी ब्रेकपूर्वी थोडाच वेळ आधी सचिनने लंकन पिचवरची आपली पहिली डबल सेंच्युरी पूर्ण केली. टेस्ट करियरमधली ही त्याची पाचवी डबल सेंच्युरी ठरली.

शिवाय मागच्या सहा टेस्टमध्ये त्याने पाच सेंच्युरी केल्या आहेत. सचिनच्या या खेळीमुळेच भारतापुढे असलेली फॉलोऑनची नामुष्की टळली. पण सेंच्युरी केल्यानंतर लगेचच 203 रन्सवर सचिन आऊट झाला.

सचिनकडून प्रेरणा घेत आज सुरेश रैनानेही आपली पहिली टेस्ट सेंच्युरी पूर्ण केली. आणि पदार्पणात सेंच्युरी झळकावणारा रैना नववा भारतीय ठरला आहे.

close