जनता दरबारात आत्महत्येचा प्रयत्न

July 29, 2010 3:51 PM0 commentsViews: 2

29 जुलै

काँग्रेसच्या मंत्र्यांच्या गांधी भवनातील जनता दरबारादरम्यान एका युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

कैलास खतकाळे असे त्याचे नाव आहे. तो पुण्यातील चाकण येथील एका खासगी कंपनीत काम करतो.

कंपनीचे व्यवस्थापन शोषण करत असल्याचे सांगत त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

कंपनी मागण्या मान्य करत नाही म्हणून कामगारांनी संघटनेची स्थापना केली आहे. ही संघटना त्वरीत बरखास्त करुन कंपनीच्या युनियनमध्ये सामील होण्याची व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते.

पण त्याला नकार दिल्याने जीवे मारण्याच्या गुंडांकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप या युवकांनी केला आहे.

close