सचिनच्या नावावर होणार आहे नवा विक्रम

October 23, 2008 7:51 PM0 commentsViews: 11

मोहाली टेस्टमध्ये हरभजनच्या बॉलिंगवर सचिननं एक अप्रतिम कॅच पकडला आणि त्याच्या खात्यात 99व्या कॅचची नोंद झाली. टेस्ट मॅचमध्ये 100 हून अधिक कॅच घेणा-यांच्या यादीत आता सचिनचं नाव जोडलं जाणार आहे. या रेकॉर्डपासून तो फक्त एक कॅच दूर आहे. आतापर्यंत खेळलेल्या 152 टेस्ट मॅचमध्ये त्याच्या नावावर 99 कॅचची नोंद आहे. 1990मधल्या सीरिजमध्ये लॉर्ड्सवर नरेंद्र हिरवाणीच्या बॉलिंगवर अ‍ॅलन लॅम्बचा घेतलेला कॅच त्याचा सर्वोकृष्ट कॅच होता असं त्याचं म्हणण आहे.

close