एमडीएमके नेते वायको यांना अटक

October 23, 2008 8:06 PM0 commentsViews: 3

तामिळनाडूमध्ये लिट्टेच्या समर्थनार्थ भाषण केलं म्हणून एमडीएमके नेते वायको यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी चेन्नईमध्ये असलेल्या श्रीलंकेच्या दुतावासावर दगडफेक केली. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे, परिस्थिती नियंत्रणात आली.दुतावासावर झालेल्या दगडफेकीची श्रीलंकेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वायको यांच्यावर कलम 124 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वायको यांची 6 नोव्हेंबर पर्यंत तुरुंगात रवानगी करण्यात आली.

close