सायनाला राजीव गांधी खेलरत्न

July 30, 2010 9:05 AM0 commentsViews: 1

30 जुलै

भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. भारत सरकारने तिला क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार खेलरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.

त्याचबरोबर जागतिक क्रमवारीत तिने दुसरे स्थानही कायम राखले आहे.

सायनासाठी मागचे दोन महिने स्वप्नवत गेले. जून आणि जुलै महिन्यात तिने सलग तीन स्पर्धा जिंकल्या. यातील दोन स्पर्धा सुपर सीरिज होत्या. इंडियन ग्रांप्री पाठोपाठ जूनच्या शेवटच्या आठवड्यात तिने सिंगापूर ओपन स्पर्धा जिंकली. आणि पाठोपाठ इंडोनेशियन ओपन सुपर सीरिज स्पर्धेत विजेतेपदही राखले.

या कामगिरीमुळे जागतिक क्रमवारीतही तिने दुसर्‍या स्थानावर झेप घेतली. खेलरत्न पुरस्कारारनंतर मीडियाशी बोलताना सायनाने या कामगिरीचे श्रेय तिच्या आई वडिलांना दिले.

तर वर्ल्ड नंबर वन होण्याच्या दृष्टीने सायनाची वाटचाल योग्य मार्गाने सुरू आहे, असे तिचे कोच पुलेला गोपीचंद यांनी म्हटले आहे.

close