सोहराबुद्दीन तपासासाठी सीबीआयला हवा वेळ

July 30, 2010 9:26 AM0 commentsViews: 3

30 जुलै

सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटरप्रकरणी सीबीआयने चौकशीसाठी आणखी वेळ मागितला आहे.

या प्रकरणाचा चौकशी अहवाल सुप्रीम कोर्टात सीबीआयने सादर केला. पण गुजरातमध्ये तपासासाठी योग्य वातावरण नाही, त्यामुळे सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटर खटल्याचे कामकाज राज्याबाहेर हलवण्याची विनंती सीबीआयने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.

सोहराबुद्दीन प्रकरणात तपास अमित शहा यांच्यापलीकडे जाऊ शकतो असेही सीबीआयने कोर्टाला सांगितले आहे.

तसेच तुल्सीराम प्रजापती बनावट एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगीही सीबीआयने सुप्रीम कोर्टाकडे मागितली आहे.

close