मुंबई – मलेरियाग्रस्त शहर!

July 30, 2010 2:38 PM0 commentsViews: 7

30 जुलै

मुंबईला मलेरियाग्रस्त शहर म्हणून घोषित करण्याचा राज्य सरकार विचार गांभीर्याने विचार करत आहे.

मुंबई शहरात सध्या मलेरियाची जोरदार साथ सुरू आहे. विशेषत: मुंबईतील सात वॉर्डांमध्ये मलेरियाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे.

तर मुंबईतील 85 टक्के झोपडपट्‌ट्या मलेरियाग्रस्त झाल्या आहेत. तसेच मुंबईत सुरू असलेल्या बांधकामापैकी 5 टक्के ठिकाणे मलेरियाने ग्रस्त आहेत. राज्याच्या आरोग्य महासंचालकांनी या प्रस्तावाला दुजोरा दिला आहे.

शिवसेना घेणार शिबिरे

मुंबईतील मलेरिया आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेत सत्तेवर असणारी शिवसेना आता शहरात आरोग्य शिबिरे भरवणार आहे. खाजगी डॉक्टरांच्या मदतीने ही शिबिरे चालवली जातील.

मलेरियाला आळा घालण्यासाठी महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा आज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतला.

यात मलेरियाची साथ आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात सरकारी हॉस्पिटल्सना खासगी डॉक्टर्स आणि खासगी हॉस्पिटल्स मलेरियाच्या निर्मूलनात मदत करतील, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

तसेच डासांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण ओळखून त्यानुसार धूरफवारणी केली जाईल, असेही यावेळी ठरवण्यात आले.

close