सुलोचना दीदींना फाळके पुरस्कार मिळावा

July 30, 2010 3:11 PM0 commentsViews: 1

30 जुलै

सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना दीदींना चित्रपट जगतातील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांनी केली आहे.

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना भारतुमार राऊत यांनी यासंदर्भात एक सविस्तर पत्र लिहिले आहे. यात त्यांनी ही मागणी केली आहे.

राष्ट्रपतींना लिहलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की सुलोचना दीदींनी 400 हून जास्त हिंदी, मराठी आणि इतर भाषांमधील सिनेमांत काम केले आहे.

सरस्वतीचंद्र ,कोरा कागज , मुकद्दर का सिकंदर अशा गाजलेल्या हिंदी सिनेमांतून त्यांनी पे्रमळ आईची भूमिका साकारली आहे.

तर मीठ भाकर, साधी माणसे, सांगत्ये ऐका, मोलकरीण आणि मराठा तितुका मेळवावा या मराठी चित्रपटांतून त्यांनी सशक्त भूमिका केल्या आहेत.

close