आयपीएलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंच्या सहभागाची शक्यता कमीच

October 23, 2008 8:15 PM0 commentsViews: 5

आयपीएलचा दुसरा सिझन भव्यदिव्य करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. पण त्यासाठी त्यांना यंदाही अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत. त्यांना पहिलाच दणका दिला तो इंग्लंड क्रिकेट बोर्डानं. इंग्लंडचा कॅप्टन केविन पिटरसन याने आधीच आयपीएलमध्ये खेळायची इच्छा बोलून दाखवली होती. परंतु पिटरसन आणि त्याच्या इंग्लंडच्या साथीदारांना अजून काही काळ त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. कारण बँकॉक इथे झालेल्या आयपीएलच्या वर्कशॉपमध्ये, इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यात याबाबत चर्चा झाली. पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नसल्यानं इंग्लडचे खेळाडू आयपीएलपासून सद्या तरी दूरच आहेत.

close