पीएमपीएलची दरवाढ मागे घ्यावी

July 30, 2010 3:23 PM0 commentsViews: 2

30 जुलै

पुण्यातील सीटी बस अर्थात पीएमपीलची दरवाढ ही बेकायदेशीर आणि अन्यायकारक असल्याने ती मागे घ्यावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

उद्या विधानभवनासमोर पीएमसीचे अध्यक्ष दिलीप बंड यांच्याविरोधात आंदोलनही करण्यात येणार आहे.

पीएमपीएलने केलेल्या दरवाढीमुळे बेस्ट, कल्याण डोंबिवली बसेस तसेच एसटीपेक्षा पीएमपीएलचे भाडे जास्त झाल्याचा दावाही करण्यात आला.

तसेच पीएमपीएलचे अध्यक्षपद आणि आरटीएचे प्रमुखपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे असणे, हा मोटर व्हेईकल ऍक्टचा भंग आहे. त्यामुळे दिलीप बंड यांनी दोनपैकी एका पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पुण्यातील स्वयंसेवी संघटनांनी केली आहे.

close