पुण्यातील प्रदूषण वाढले

July 30, 2010 4:08 PM0 commentsViews: 103

30 जुलै

पुण्यातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नुकत्याच आलेल्या पर्यावरण अहवालात हे नमूद करण्यात आले आहे.

पुण्यातील हवेच्या प्रदूषणामध्येही दीड पटीने वाढ झाली असल्याचे या पर्यावरण अहवालात म्हटले आहे.

पुणे शहरापुढे नदी नाल्याचे प्रदूषण, हवेचे प्रदूषण आणि अतिक्रमण या तीन प्रमुख समस्या असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

हा पर्यावरण अहवाल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. द एनर्जी ऍण्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटने हा अहवाल तयार केला आहे.

या अहवालातील महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे…

2001 मध्ये शहरात वाहनांची संख्या 9 लाख होती. आता ती 19 लाख झाली आहे

शहराचा उर्जेचा वापर वाढला आहे, वीजेची मागणी 500 दशलक्ष युनिटने वाढली आहे

कार्बनचे उत्सर्जन किती होते आणि त्याला आळा कसा घालता येईल, यासाठी कार्बन फूटप्रिंट तयार केली जाणार

असा प्रयत्न करणारी ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे

close