पुण्यातील पत्की भगिनींच्या खुनाचा उलगडा

July 30, 2010 4:16 PM0 commentsViews: 5

30 एप्रिल

पुण्यातील कोथरूड भागातील पत्की भगिनींच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.

17 एप्रिल रोजी कर्वेनगर भागात राहणार्‍या स्मिता प्रभाकर पत्की आणि सुलभा पाच्छापूरकर या बहिणींचा निर्घृण खून करण्यात आला होता.

जवळपास साडेतीन महिन्यानंतर या प्रकरणात सोलापूरच्या अंबादास श्रीपती जाधव याला कोथरूड पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात एकूण 4 आरोपी असून सर्व सोलापूरचे आहेत.

चोरीच्या उद्देशाने आरोपी शाकंभरी बंगल्यात घुसले. त्यांनी मोबाईल, सोन्याच्या पाटल्या चोरल्या. त्यावेळी पत्की भगिनींनी प्रतिकार केल्याने आरोपींनी त्यांचा खून केला असावा, असा कयास व्यक्त करण्यात आला होता.

पुण्याचे मावळते पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी माहिती दिली.

close