पुण्यात महिला सॉफ्टवेअर इंजीनिअरची हत्या

July 31, 2010 10:13 AM0 commentsViews: 6

31 जुलै

पुण्यात 22 वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजीनिअरची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

दर्शना टोंगारे असे या तरुणीचे नाव आहे. ती येरवडा परिसरातील आयबीएम कंपनीत ट्रेनी सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून काम करत होती.

बावधन परिसरात काल रात्री या तरुणीची हत्या झाली.

काही दिवसांपूर्वीच दर्शना कंपनीत रुजू झाली होती.

close