‘गहू सडण्याला पवारच जबाबदार’

July 31, 2010 10:26 AM0 commentsViews: 20

31 जुलै

सरकारी गोदामात लाखो टन गहू सडला. त्याला शरद पवार यांचे अन्न व नागरी पुरवठा खातेच जबाबदार आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसने केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये गव्हावरून कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.

देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. पण जागेअभावी लाखो टन धान्याचा साठा सडत चालला आहे. सरकारी गोदामांमध्ये बफर स्टॉक शिवाय अतिरिक्त 160 लाख टन गहू पडून आहे. पण महागाईने भरडलेल्या सर्वसामान्यांना मात्र स्वस्त दरात अन्न धान्य उपलब्ध करून दिले जात नाही.

याला अन्न व नागरी पुरवठा खात्याचे जुनाट धोरण जबाबदार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गहू विक्रीचे नवे धोरण स्वातंत्र्यदिनी जाहीर करावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे. या मागणीचे पत्र प्रदेश काँग्रसने पंतप्रधान मनमोहन सिंह यांना लिहिले आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते कन्हैय्यालाल गिडवाणी यांनी ही मागणी केली आहे.

close