मुंबई, ठाण्यात मुसळधार

July 31, 2010 12:25 PM0 commentsViews: 2

31 जुलै

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत आजही जोरदार पाऊस बरसला. सकाळपासूनच पाऊस सुरू असला तरी लोकल 10 ते 15 मिनिटे उशीराने धावत होत्या.

काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मात्र कुठेही मोठी वाहतुकीचीकोंडी झाली नाही. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या सर्वच धरणांच्या पातळीत या पावसामुळे वाढ झाली आहे.

बारवी धरण भरले

बदलापूरचे बारवी धरण पूर्णपणे भरले आहे. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच जुलै महिन्यामध्ये हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण- डोंबिवली परिसराला या धरणातून पाणीपुरवठा होतो.

close