मलेरियावरून आरोप-प्रत्यारोप

July 31, 2010 12:55 PM0 commentsViews: 2

31 जुलै

मुंबईत मलेरियाचा मोठा फैलाव झाला असताना साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्याऐवजी राज्य सरकार आणि महापालिका एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

मलेरियाचा आढावा घेण्यासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महापौर बंगल्यावर बैठक घेतली. त्यानंतर मलेरियाच्या फैलावाला राज्य सरकारच जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली.

तर दुसरीकडे, मुंबईतील मलेरियाच्या फैलावाला महापालिकाच जबाबदार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. गेल्या 3 वर्षापासून मुंबई, ठाणे आणि नाशिक या महापालिका क्षेत्रांमध्ये मलेरियाचं प्रमाण वाढत आहे. गेल्या 6 – 7 महिन्यांपासून मलेरियाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा अशा लेखी सूचना महापालिकेला वारंवार पाठवण्यात आल्या. पण महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. आणि आज परिस्थिती गंभीर बनल्याचा आरोप आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी महापालिकेवर केला आहे.

सरकारचे निर्देश

मुंबईतील मलेरिया आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी काही निर्देष जारी केले आहेत. सर्व सरकारी तसेच खाजगी हॉस्पिटल्सना संध्याकाळी एक तास तापाची ओपीडी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या हॉस्पिटल्सना काही बेड्स मलेरियाग्रस्त पेशंटसाठी राखीव ठेवायला सांगण्यात आले आहे.

सर्व कामगार हॉस्पिटल्स तसेच रेल्वेची दोन्ही हॉस्पिटल्स आणि बीपीटीच्या हॉस्पिटल्समध्येही मलेरियाची ओपीडी सुरू करण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे. याचबरोबर बांधकामाच्या ठिकाणी राहाणार्‍या मजुरांना कीटकनाशक भारीत मच्छरदाण्या पुरवण्याचे बंधन बांधकाम व्यावसायीकांना घालण्यात आले आहे.

close