पवारांच्या मंत्र्यांना कानपिचक्या

July 31, 2010 1:17 PM0 commentsViews:

31 जुलै

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा आज शरद पवार यांनी घेतला. त्यात पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी वेळ देण्याचा आदेश सर्व मंत्र्यांना पवारांनी दिले आहेत.

गेल्या आठ महिन्यांच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे परफॉर्मन्स अप्रायझल शरद पवारांनी केले. पालकमंत्री आणि संपर्कमंत्र्यांनी त्या-त्या जिल्ह्यांमध्ये पक्षसंघटनेसाठी किती काम केले, याचा लेखाजोखा पवारांनी बैठकीत मांडला.

बहुतेक मंत्री स्वत:चा मतदारसंघ सोडला तर अन्य भागात पक्षकार्य करत नाहीत. त्यामुळे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी वेळ द्या, अन्यथा पक्षासाठी काम न करणार्‍या मंत्र्यांबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराच पवारांनी मंत्र्यांना दिला आहे.

याखेरीज मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या मंत्र्यांबाबतच्या वादांवर आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा करण्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आले.

close