पुण्यात पुन्हा H1N1…

July 31, 2010 1:28 PM0 commentsViews: 6

31 जुलै

पुण्यात H1N1च्या आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दोन दिवसांत पाच वर्षांच्या बालकासह 5 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

याचबरोबर पुण्यात 1 एप्रिलपासून बळी गेलेल्यांची संख्या 80 वर पोहोचली आहे. तपासणीत आतापर्यंत 37 पेशंट पॉझिटीव्ह निघाले आहेत. यापैकी 22 जणांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. मात्र ही H1N1 ची दुसरी लाट नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

सोलापुरातही फैलाव

पुण्यापाठोपाठ आता सोलापुरातही H1N1चा फैलाव होत आहे. सोलापुरात H1N1मुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेवर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सध्या आणखी दोन महिलांवर उपचार सुरू आहेत.

यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात प्रतिबंधक उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकार्‍यांनी दिली.

close