जळगावात अज्ञात साथ सुरूच

July 31, 2010 1:37 PM0 commentsViews: 1

31 जुलै

जळगाव जिल्ह्यातील अज्ञात साथ अजूनही सुरुच आहे. एनआयव्हीच्या रिपोर्टमध्ये काही निष्पन्न न झाल्यामुळे हा गूढ रोग असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

रिपोर्टमध्ये हा आजार विषाणूंमुळे नाही, पाण्यामुळे नाही तसेच अस्वच्छतेमुळे देखील नाही, असे म्हटले आहे.

हा आजार नेमका कशामुळे होतो, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही.

जळगावात आतापर्यंत जवळपास 788 विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले आहेत.

close