नांदेडमध्ये रेल्वे ट्रॅक खचला

July 31, 2010 3:14 PM0 commentsViews: 16

31 जुलै

पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील रेल्वे ट्रॅक खचला आहे. त्यामुळे नांदेड – अदिलाबाद मार्गावरील पाच गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-नागपूर, अदिलाबाद-नांदेड, मुदखेड-अदिलाबाद, नांदेड-अदिलाबाद या पाच गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

बोरज धरण भरले

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बोरज धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. या पाण्यामुळे खेड-आष्टी रस्ता बंद झाला असून आष्टी गावासह चार वाड्यांचा संपर्क तुटला आहे.

यामुळे शालेय विद्यार्थीही अडकून बसले. खेड आणि दापोली तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर खेड मध्ये पुन्हा पाणी भरण्याची शक्यता आहे.

मातीचा बंधारा फुटला

मुरबाड तालुक्यातील तळेगाव येथील ठाणे जिल्हा परिषदेने 2004मध्ये बांधलेल्या शिरसोनेवाडीच्या लगतचा मातीचा बंधारा आज सकाळी पावसामुळे फुटला. 56 दक्षलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेला हा बंधारा 820 मीटर लांबीचा आहे.

बंधारा बांधण्यासाठी 3 कोटी 80 लाख रुपये खर्च आला होता. काल सकाळी या बंधार्‍याला भेगा पडल्या होत्या. आज पहाटे पाचच्या सुमारास तो फुटला. या बंधार्‍याचा 40 मीटरचा भाग पाण्यात वाहून गेला.

बंधार्‍यातील 56 दक्षलक्ष पाणी वाहून गेल्याने बंधार्‍याखाली असलेल्या 100 हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. तसेच शेजारच्या पाड्यातील 22 घरांमध्ये पाणी शिरले आहे.

भिंवंडीत नाल्याचे पाणी

भिवंडी महानगर पालिकेने नालेसफाई चांगली न केल्याने पाऊस सुरु होताच शहरातील मार्केट, पद्मानगर, म्हाडा कॉलनी, नदीनाका, इदगारोज या भागातील 22 दुकानात आणि सुमारे 150 घरांमध्ये पाणी घुसले आहे.

या पाण्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहे. पण महापालिकेच याकडे दुर्लक्ष आहे.

close