मोदींचे पुन्हा स्वाभिमान कार्ड

July 31, 2010 3:24 PM0 commentsViews: 1

31 जुलै

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी आता गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा स्वाभिमानी पत्ता बाहेर काढला आहे.

हे चकमक प्रकरण गुजरातबाहेर हलवणे म्हणजे राज्याच्या न्यायव्यवस्थेचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काल सीबीआयने हा खटला गुजरातबाहेर हलवण्याची विनंती सुप्रीम कोर्टाकडे केली होती.

त्यावर नरेंद्र मोदी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मात्र या अगोदरही गुजरात दंगलीसंदर्भातील केस गुजरातबाहेर हलवल्या गेल्या आहेत.

close