रिलायन्समध्ये काम करणा-या आनंदीता गोस्वामीच्या खून प्रकरणी आरोपीला अटक

October 23, 2008 8:32 PM0 commentsViews: 3

नवी मुंबईत असलेल्या रिलायन्स कंपनीच्या धिरूभाई अंबानी नॉलेज सिटीत काम करणा-या आनंदीता गोस्वामी या अधिकारी महिलेची हत्या करण्यात आली होती. तिचा मारेकरी हा तिच्याच कार्यालयात काम करणारा वरिष्ठ अधिकारी होता. जॅकब पिंटो असं त्या आरोपीचं नाव आहे. आनंदिता मिश्रा या अधिकारी महिलेची हत्या केल्यानंतर तो चेन्नईला पळून गेला होता. तपासामध्ये तिथंही त्यानं पोलिसांना गुंगारा दिला होता. पण काल रात्री मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

close