जम्मू-काश्मीरमध्ये तणाव कायम

July 31, 2010 3:28 PM0 commentsViews: 2

31 जुलै

जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण कायम आहे. संपूर्ण काश्मीर खोर्‍यात कर्फ्यू लावण्यात आला आहे. नागरिकांच्या हिंसक निदर्शनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस तसेच पॅरामिलिटरी फोर्सेस तैनात करण्यात आल्यात.

सोपोर आणि पट्टण इथे पोलिसांच्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले. त्याचा निषेध करण्यासाठी खोर्‍यात ठिकठिकाणी हिंसक निदर्शने होत आहेत.

जमावाच्या दगडफेकीमुळे गोळीबार करावा लागला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. रामबाग, श्रीनगर आणि त्राल भागात कालही तणावाचे वातावरण होते.

काश्मीर खोर्‍यात पोलिसांच्या गोळीबारात गेल्या 5 आठवड्यांत 19 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

close